Home क्राईम स्वत:च्या लग्नासाठी रजा नाकारली ; जवानाने वरिष्ठावर झाडल्या १३ गोळ्या

स्वत:च्या लग्नासाठी रजा नाकारली ; जवानाने वरिष्ठावर झाडल्या १३ गोळ्या


asssm
 

हावडा (वृत्तसंस्था) स्वत:च्या लग्नासाठी रजा नाकारल्याने संतापलेल्या आसाम राज्य सशस्त्र पोलीस दलाच्या जवानाने आपल्या वरिष्ठावर १३ गोळ्या झाडल्याची घटना गुरुवारी घडली आहे. या गोळीबारमध्ये पोलीस उपनिरीक्षक भोलानाथ दास यांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले आहेत.

 

 

लक्ष्मीकांत असे या २६ वर्षीय शिपायाचे नाव असून त्याचा २० मे रोजी विवाह सोहळा होता. परंतु रजा मिळत नसल्यामुळे जवान लक्ष्मीकांत हा नैराश्यात होता. रजा नाकारल्यामुळे त्याचा त्याचे वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक भोलानाथ दास यांच्याशी वाद झाला. यानंतर संतापाच्या भरात लक्ष्मीकांत याने थेट दास यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल राजबंशी आणि शिपाई रोंतूमणी बोधक जखमी झाले. ही घटना घडल्यानंतर लक्ष्मीकांत याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound