सावदा ता. रावेर प्रतिनिधी । शेतकऱ्यांचे कृषी पंपासाठी लागणारे वीज कनेक्शन न तोडण्याबाबत प्रहार जनशक्तीचे सावदा महावितरण कार्यालयाला निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांची वीज पुरवठा खंडीत झाल्याने परिसरातील प्रश्न गंभीर झाला आहे. शेतात पाणी नसल्यामुळे उभे पिक जळत आहे. शेतकऱ्यांना व जनतेला पाणीपुरवठा होण्यासाठी वीज पुरवठा सुरळीत करावा, शेतकऱ्यांची तोडलेली वीज कनेक्शन जोडण्यात यावे. यावल तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतातील वीज तोडल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विजपुरवठा सुरळीत ठेवावा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे महावितरण कार्यालयावर येणाऱ्या दिवसात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे निवेदन दिल्यानंतर महावितरण विभागाचे अभियंता यांच्याकडून आश्वासन देण्यात आले की, आजपासून शेतकऱ्यांचे बंद विज कनेक्शन जोडण्यात येईल असे सांगितले.
या निवेदनावर यावल तालुका अध्यक्ष सुभाष सोनवणे, पिंटू धांडे, तुकाराम बारी, गोकुळ कोळी, योगेश कोळी, विजय मिस्तरी, विक्की काकडे, सचिन कोळी, संग्राम कोळी, निरंजन सावळे, धर्मेंद्र तायडे, पिंटू मंदावळे, विनोद कपडे, शांताराम कोळी यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.