यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर विधानसभा मतदार संघातील निगडीत असलेल्या रस्त्यांसह विविध समस्यांबाबत युवा नेते डॉ. कुंदन फेगडे यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेवून चर्चा करण्यात आली.
यावल येथील माजी नगरसेवक तथा भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा सरचिटणीस डॉ कुंदन फेगडे यांनी नुकतीच मंत्री ना. गिरीश महाजन यांची मुंबई येथील सेवासदन या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. याप्रसंगी जामनेरच्या माजी नगराध्यक्ष साधनाताई महाजन आणि संपूर्ण महाजन कुटुंबासोबत श्री गणरायाची आरती करण्याचे भाग्य लाभले. यावेळी ना.गिरीश महाजन यांच्याशी रावेर विधानसभा मतदार संघातील प्रामुख्याने यावल नगर परिषदक्षेत्रातील रस्त्यांची झालेली अवस्था व ग्रामीण परिसरातील जोडणाऱ्या रस्त्यांच्या समस्यांसह विविध नागरीकांच्या समस्याबाबत सविस्तर चर्चा केली. दरम्यान या संदर्भात आपण विशेष लक्ष देवुन या रस्त्यांच्या कामांना प्राधान्य क्रमांकाने पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले आहे.