Home Cities अमळनेर उतार्‍यावर नाव लावण्यासाठी टाळाटाळ : कुटुंब करणार आमरण उपोषण

उतार्‍यावर नाव लावण्यासाठी टाळाटाळ : कुटुंब करणार आमरण उपोषण

0
56

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बरेच प्रयत्न करून देखील सात-बारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने तालुक्यातील पाडळसरे येथील एका कुटुंबाने आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

या संदर्भातील माहिती अशी की,  “अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथील ज्ञानेश्वर पाटील,यशोदाबाई पाटील,नंदाबाई पाटील या एकाच कुटुंबातील सदस्यांनी ७/१२ वर वारस लावण्यासाठी प्रशासनाविरोधात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. सदर कुटुंब हे उद्या दि.१ सप्टेंबर रोजी त्याच शेतात आमरण उपोषणास बसणारं आहेत.” 

यासंदर्भात पाटील कुटुंबातील सदस्यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच मारवड पोलीस प्रशासन व मारवड मंडळ अधिकारी यांना महितीस्तव निवेदनाची प्रत रवाना केली आहे.


Protected Content

Play sound