दहावी परीक्षा शुल्क परत करा- दिव्या भोसले

जळगाव प्रतिनिधी । कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रार्दूभाव वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने यंदा दहावी बोर्ड परीक्षा रद्द केली असून गोरगरीब विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क परत करण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी जळगाव जिल्हा परीषद शिक्षण अधिकारी यांना उत्तर महाराष्ट्र प्रदेश समन्वयक दिव्या यशवंत भोसले यांनी निवेदनाद्वारे केली.

 कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर शाळा सुरू झाल्या होत्या दहावी बारावी परीक्षेची तयारीही अंतिम टप्प्यात आली होती असे असतानाच कोरोनाची दुसरी लाट जिल्हयात धडकली पहिल्या लाटेपेक्षा तीव्र असल्याने रूग्ण वाढीचा वेख अधिक आहे तसेच मृत्यूचेही प्रमाण जास्त असल्याने शासनाने संभाव्य धोका ओळखून दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. 

जळगाव जिल्हातून एकूण ५८ हजार 317 विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज केला होता एकूण परीक्षा शुल्कापोटी 2 कोटी ४२ लक्ष 1हजार 500रु  एवढी  रक्कम परीक्षा मंडळाकडे जमा झाली असून कोरोना संकटामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याने परीक्षा शुल्लकापोटी प्रत्येकी पाचशे तेसाडे पाचशे असे २ कोटी ४२लाख एक हजार पाचशे इतकी रक्कम परत मिळाली नाही, तरी गोरगरीब विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्लक परत करण्याची कार्यवाही तातडीने कार्यवाही करण्यात यावी याबाबत जळगाव जिल्हा परीषद शिक्षण अधिकारी यांना उत्तर महाराष्ट्र प्रदेश  समन्वयक दिव्या यशवंत भोसले यांनी निवेदनाद्वारे मागणी केली.

Protected Content