जळगाव प्रतिनिधी । गावाकडील कुठल्याही आजाराचा रूग्ण आला तर त्याला मुंबईतील नामांकित खासगी हॉस्पिटलमध्ये विनामुल्य औषधोपचार मिळवून देणारे रेड स्वस्तिक सोसायटीचे व्यवस्थापक जितेंद्र पाटील यांना नुकताच संत गाडगेबाबा लोकमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार त्यांना राष्ट्रसंत खन्जरी वादक सत्यपाला महाराज यांच्या हस्ते देण्यात आले. ग्रामीण भागासह गरजू रूग्णांना मोफत सेवा कशी उपलब्ध करून देता येईल यासाठी जितेंद्र पाटील हे नेहमी धडपत असतात. ते दिवसरात्र रूग्णांची अविरत सेवा करत असून सोबत दिव्यांग लोकांना जयपूर फुटचे वाटपही ते करत असतात. अनाथ मुलांना दैनंदिन लागणारे साहित्य व जेवण ते देत राहतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना रविवारी जनसंग्राम संस्थाच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.
रेड स्वस्तिक सोसायटीचे जितेंद्र पाटील यांना पुरस्कार प्रदान
6 years ago
No Comments