जळगाव (प्रतिनिधी) :भविष्यात रक्ताची गरज भासल्यास तेव्हा तत्काळ रक्त मिळाले पाहिजे, इतर रक्त पेढीवाले ज्या प्रमाणे ग्रामिण भागात सेवा देतात त्याच प्रमाणे रेड-प्लस ब्लड बँकेतर्फे सुविधा पुरविण्यात यावी अशी अपेक्षा ना. गुलाबराब पाटील यांनी आज रविवार ७ जुलै व्यक्त केली. ते एम.जे. कॉलेज रोड, भोईटे शाळे समोर आरोग्य सेवा मेडिकल फाऊंडेशन संचालित रेड प्लस रक्त पेढी (ब्लड बँक )च्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी माजी मंत्री सुरेश दादा जैन, माजी महापौर ललित कोल्हे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, विष्णू भंगाळे, डॉ. ए. जी. भंगाळे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष अलहाज अ. गफ्फार मलिक, इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष करीम सालार, एमआयएम गटनेता रियाज बागवान, मनसे जिल्हा सचिव एड. जमील देशपांडे, नगरसेवक गणेश सोनवणे, नगरसेविका उज्वला बेंडाळे, जिल्हा मेडिकल डीलर असोसिएशन अध्यक्ष सुनील भंगाळे आदी उपस्थित होते.दरम्यान, माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी जास्तीत जास्त युवकांची रक्तदान करावे असे आवाहन यावेळी केले. तसेच जमील देशपांडे, करीम सालार,अलहाज अ. गफ्फार मलिक, डॉ. ए. जी. भंगाळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अय्याज मोहसीन, वैशाली पाटील यांनी केले.