यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | २१ कोटी रूपयांची मालमत्ता यावलची जे. टी. महाजन सहकारी सुतगिरणी ही कर्जबाजारीमुळे वादाच्या भोऱ्यात सापडली असतांना शासकीय यंत्रणेने सर्व नियम धाब्यावर ठेवुन नियमबाह्य खरेदी करून दिलेल्या जे. टी. महाजन सहकारी सुतगिरणीची तक्रार यावलचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा प्रवक्ते अतुल पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली आहे. या संपुर्ण नियमबाह्य बेकायद्याशीर रित्या करण्यात आलेल्या खरेदी व्यवहाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
याबाबत यावलच्या दुय्यम निबंधक वैशाती जावळे यांनी लाईव्ह ट्रेंड न्युजशी बोलतांना दिलेल्या माहितीत म्हटले आपण सदरच्या सुतगिरणीची खरेदी नोंद जेडीसीसी बॅंक व जिल्हा सहनिबंधक यांनी घेतलेल्या अभिनिर्णयाच्या आधारावर आणि नियमांच्या चाकोरीत राहुन केली असल्याचे म्हटले आहे. दरम्यान यावलच्या दुय्यम निबंधक वैशाली जावळे यांनी जे. टी. महाजन सहकारी सुतगिरणीवर नगरपरिषद सुमारे दीड कोटी रूपयांसह इतरांचा थकबाकीचा बोजा असतांना या सूतगिरणीचा खरेदी नोंदणी कशी झाली असा प्रश्न तक्रारीत उपस्थित केला आहे. या संपुर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते तथा यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केली आहे.