पाचोरा प्रतिनिधी । जय किरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूलने यावर्षी देखील एस. एस. सी. परीक्षेत १०० टक्के यशाची परंपरा सलग नवव्या वर्षीही कायम राखली आहे. या उत्तुंग यशाचे शिखर गाठणाऱ्या विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला आहे.
ह्या वर्षी आपल्या शाळेतून तीन विद्यार्थी अनुष्का पाटील, राज पाटील, कांचन पाटील या विद्यार्थ्यांचा आज स्वागत समारंभ संचालक मंडळा तर्फे त्यांचा ट्रॉफी देऊन व मानधन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना भावी पुढील शैक्षणिक वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. ह्या कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद कर्मचारी उपस्थित होते. इ.१० वीत गुणवंत प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांना स्व. कांताबाई भागचंद बोथरा यांचे स्मरणार्थ स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे परिसरातुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे.