जळगाव प्रतिनिधी । फ्लॅट विक्रीचा तोंडी व्यवहार ठरलेला असतांना फेसबुकवरील फोटो वेगळे करून आणि बनावट कागदपत्राद्वारे फ्लॅट संदर्भात बनावट सौदापावती करून दाम्पत्याची फसवणूक केल्याप्रकारणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, पुजा हरीष झंवर आणि त्यांचे पती हरीष रामचंद्र झंवर दोन्ही रा. मारवाडी गल्ली पाळधी ता. धरणगाव यांचा मालकीचा पिंप्राळा शिवारातील गट क्रमांक ३३ येथील एसएमआयटी महाविद्यालयाजवळील वासू कमल अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर फ्लॅट आहे. त्यांच्या फ्लॅटमध्ये दिनेश रामचंद्र उर्फ रमेशचंद्र तिवारी हा आपल्या परिवारासह राहतो. २४ जुलै रोजी दिनेश तिवारी यांनी फसवणूक केल्याप्रकरणी पुजा झवर आणि हरीष झंवर यांच्याविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्यात झंवर दाम्पत्याला जामीन मिळाल्यानंतर आज २० सप्टेंबर रोजी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तिवारीसह इतर सात जणांविरोधात तक्रार दिली.
सविस्तर माहिती अशी की, दिनेश रामचंद्र उर्फ रमेशचंद्र तिवारी व त्याची पत्नी लिलाबाई दिनेश तिवारी यांना हरीष झंवर यांचा मालकीचा फ्लॅट विकत घ्यायचा होता. दरम्यान, फ्लॅटवर २०१७ मध्ये स्टेट बँक ऑफ हैदराबाद बँकेचा ३० लाख ४७ हजार ६८५ रूपयांचा आणि १० लाख रूपये एसबीआय बँक यांचा बोजा बसलेला आहे. तिवारी दाम्पत्याने या फ्लॅटसाठी कोणताही लेखी सौदापावती झालेला नव्हता. फक्त तोंडी आणि काही लाखात सौदा ठरलेला होता. यासाठी तिवारी यांनी १ हजार रूपयाचे टोकन आणि काही पैसे गुगल पे ने काही रक्कम इंवर यांना दिले होते. परंतू असे असतांना दिनेश रामचंद्र उर्फ रमेशचंद्र तिवारी, त्याची पत्नी लिलाबाई तिवारी, प्रकाश शामलाल कटारीया रा. सेंट्रल फुले मार्केट जळगाव, अतुल अशोक खरे रा. जोशीपेठ, निलेश सुभाष पाटील रा. कुंभारी सीम ता. जामनेर, प्रेमसिंग विश्वसिंग पाटील रा. देवपिंप्री ता. जळगाव आणि बिरज इंद्ररचंद्र जैन रा. आदर्श नगर जळगाव यांनी इंवर दाम्पत्याचे फेसबुकवरील फोटोच्या आधारे आणि बनावट कागदपत्रे घेवून खोटा सौदापावती केली असून इंवर दाम्पत्याची फसवणूक केली आहे. याप्रकरणी झंवर दाम्पत्याने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात फसवूणक झाल्याची आणि खोटा गुन्हा केल्याची तक्रार दिली. पुजार झंवर यांच्या तक्रारीवरून तिवारी दाम्पत्यासह इतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.