नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना न मिळाल्यामुळे पक्षामध्ये नाराजी पसरली आहे. अशातच आता नाशिकचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि देवळाली व्यापारी बँकेचे संचालक निवृत्ती अरिंगळे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या अडचणी वाढल्या आहे.
नाशिक जिल्हयात आमचे तीन आमदार आहे, त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्या हवी होती असा दावा अरिंगळे यांनी केला आहे. यावेळी अरिंगळे म्हणाले की, गेल्या ४० वर्षापासून मी काम करतोय. व्यापारी बँकेचा मी अनेक वर्षे अध्यक्ष राहिलो आहे. बँकेचे 75 हजार सभासद लोकसभा मतदारसंघात आहे. शेतकऱ्यांसोबत माझा मोठा संपर्क आहे, मोठे आंदोलने केले आहेत. शहर आणि ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून मी काम करतोय. महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकारणात नाशिकची जागा शिवसेनेला गेली. त्यामुळे मी अपक्ष अर्ज भरला आहे. दरम्यान, भुजबळांना उमेदवारी डावलून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झाल्याने नाशिकमध्ये ओबीसी समाजाची आक्रमक झाल्याचे चित्र आहे. ओबीसी समाजाकडून नाशिकमध्ये होर्डींग्स लावण्यात आले आहेत. आम्ही ७० टक्के ओबीसी आहोत तरीही तिकीट मिळाले नाही. ‘आता तरी उठ ओबीसी जागा हो!!’ असा मजकूर होर्डिंगवर लावण्यात आला आहे. मतपेटीत आपली ताकद दाखवून देण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. त्यामुळे आता हेमंत गोडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.