अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत तिच्या कुटुंबाला मारहाण

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील वाल्मिक नगरात एका भागात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला क्या हाल है मेरी जान असे म्हणून तिचा विनयभंग केला. यावर मुलीने दोघांना हटकल्याचा राग आल्यान लाकडी काठीने मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

भुसावळ मधील वाल्मिक नगरातील एका भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्याला आहे. १० एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी ही घरासमोर बसलेली असतांना नितीन जगदीश पथरे आणि जितेंद्र किसन गोंडाले दोन्ही रा. वाल्मिक नगर, भुसावळ यांनी पिडीत मुलीला क्या हाल है मेरी जान असे म्हणाला. त्यावर पिडीत मुलीने जाब विचारला याचा राग आल्याने नितीन पथरे आणि जितेंद्र गोंडाले यांनी मुलीची हात पकडत शिवीगाळ करत काठीने मारहाण केली. तसेच पिडीत मुलीची आई व बहिण यांना देखील लोखंडी पाईपाने मारहाण करून दुखापत केली व जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर अखेर शनिवारी ४ मे रोजी मध्यरात्री १२.३० वाजता पिडीत मुलीसह तिच्या नातेवाईकांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी नितीन जगदीश पथरे आणि जितेंद्र किसन गोंडाले दोन्ही रा. वाल्मिक नगर, भुसावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल दुकळे हे करीत आहे.

Protected Content