जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात कोरोना बाधितांची दिलासादायक आकडेवारी दिसून आली. जिल्ह्यात आज ७८९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ८१६ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे. जळगाव शहरासह भुसावळ आणि मुक्ताईनगर तालुक्यात संक्रमित रूग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे.
जिल्ह्यातील आजची आकडेवारी
जळगाव शहर-१२२, जळगाव ग्रामीण-२३, भुसावळ-१०६, अमळनेर-१६, चोपडा-३७, पाचोरा-२९, भडगाव-१५, धरणगाव-७, यावल-४१, एरंडोल-११, जामनेर-३०, रावेर-५०, पारोळा-२७, चाळीसगाव-८७, मुक्ताईनगर-१६१, बोदवड-२३ आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण ७८९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्हा कोवीड प्रशासनाने दिलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण १ लाख ३३ हजार २१२ रूग्ण बाधित आढळले आहे. त्यापैकी १ लाख २० हजार ९७१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ९ हजार ८५५ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात १२ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.