नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय रिझर्व्ह बँकेने १० बँकांवर नियमांचे पालन न केल्याने कडक कारवाई केली आहे. या १० बँकांना ६० लाख रूपयांपर्यंतचा दंड ठोठवला आहे. त्यांनी बँकीग नियमाचे पालन आणि ग्राहकांची सुरक्षितता याचे उल्लघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर हा दंड लावण्यात आला आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशातील बँकाचा या समावेश आहे.
या बँकांमध्ये महाराष्ट्रातून सोलापूरतील सोलापूर जनता सहकारी बँक, नाशिकतील जनलक्ष्मी सहकारी बँक, छत्रपती संभाजीनगरतील स्टँडर्ड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, मुंबईतील उत्कृष्ट सहकारी बँक, पश्चिम बंगालातून हावडातील हावडा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तामिळनाडूतून राजापालयमतील राजापालयम को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक, दिंडीगूलतील दिंडीगुल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, उत्तर प्रदेशातून मथुरातील मथुरा जिल्हा सहकारी बँक, हिमाचल प्रदेशातून मंडीतील मंडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, कर्नाटकातून चिक्कमगलूरूतील चिक्कमगलुरु जिल्हा सहकारी सेंट्रल बँक लिमिटेड यांचा समावेश आहे.