नवी दिल्ली प्रतिनिधी । डिजिटल इंडियामुळे ऑनलाईन व्यवहारात प्रचंड वाढ झाली आहे. बँकांच्या रागांपासून सुटका मिळावी यासाठी इंटरनेट बँकिंगला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी आरटीजीएस आणि एनईएफटी व्यवहार प्रक्रिया अवलंबली जात असून वेळेत बदल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, डिजिटल इंडियात ऑनलाईन व्यवहारामध्ये मोठी वाढ झाल्याने यासाठीच्या वेळेतही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी सकाळी 8 वाजता या व्यवहारासाठी सुरुवात होत होती. मात्र नव्या नियमानुसार सकाळी 7 वाजता हे व्यवहार सुरू होतील. या महिन्यातील 26 तारखेपासून या व्यवहाराची वेळ बदलण्यात येईल. सध्या ग्राहकांच्या आवक-जावक व्यवहारासाठी सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंतच ऑनलाईन व्यवहार करता येणार आहे.