रावेर येथे केस-त्वचारोग मोफत शिबिर

 

रावेर प्रतिनिधी । मुंबई येथील प्रसिद्ध केस व त्वचारोग तज्ञ डॉ. निखिल सुपे यांचे मोफत तपासणी शिबीराचे आयोजन येत्या रविवारी (दि. ७ जुलै) रोजी शहरातील साईश्रध्दा मेडिकल, आशिर्वाद लॉज, रामबाग मैदान, स्टेशन रोड येथे आयोजित करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, त्वचारोग, केस विकार, मुरूम, चेह-यावरील सुरकुत्या, नखांच्या आजार निदान विषयक उपचारसाठी मोफत तपासणी रविवारी (दि. ७ जुलै) रोजी सकाळी 9 ते 2 वाजेच्या दरम्यान करण्यात आले असून, सर्वांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच केस व त्वचारोग तज्ञ डॉ. निखिल सुपे हे स्व:ता तपासणी करणार आहेत. शिबिरात सहभागी होण्यासाठी आगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे.

नोंदणीसाठी संपर्क निलेश महाजन मो. ९७६४६४८०१६, अमोल कासार ९५५७२११५१५

Protected Content