पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी रविंद्र पाटील

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा येथील पारोळा कृ. उ. बा. समितीचे माजी उपसभापती सुधाकर पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर आज १० ऑगस्ट शनिवार रोजी उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. सर्वानुमते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संचालक इंधवे येथील रविंद्र रामराव पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. ह्या प्रसंगी सभापती अण्णासो सतीश भास्कराव पाटील संचांलक व शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, उपसभापती संचालक सुधाकर पाटील, जेष्ठ संचालक नागराज पाटील, संचालक बबन पाटील, संचालक सतीश पाटील, महिला संचालक रेखा पाटील, संचालक बबिता पाटील, संचालक निंबा पाटील, संचालक सुरेश वंजारी, व्यापारी संचालक अनिल मालपुरे, जितेंद्र वाणी, हमाल मापाडी राजेंद्र मराठे यांच्या उपस्थितीत सर्वानुमते उपसभापती म्हणून निवड करण्यात आली.

सुनील रामोशी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पहिले. ह्या प्रसंगी उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख. प्रा आर बी पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष महाजन, राष्ट्रवादी जिल्हसरचिटणीस शांताराम पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रवीण पाटील, रोहन पवार, उपतालुका प्रमुख दादा पाटील, सोमनाथ वाणी , उपतालुका प्रमुख बाळासाहेब पाटील, लखन वाणी, कृष्णा शिंपी, युवासेना तालुका प्रमुख रवी पाटील, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष योगेश रोकडे, युवासेना उपजिल्हा प्रमुख पराग गुंजाळ, , कट्टर शिवसैनिक भूषण टिपरे , वाहतूक सेना तालुका प्रमुख तुषार पाटील, व्यापारी आघाडी विवेक माळी, सुमित, सुधाकर पाटील, महेंद्र पाटील, शिवदूत अमोल पाटील, मेहु येथील सरपंच विकास नाना, विचखेडे येथील सेक्रेटरी अप्पा, अनिल पाटील व पारोळा कृ उ बा समितीचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.

उपसभापती पदी निवड झालेले रविंद्र पाटील हे इंधवे येथील रहिवाशी असून पंचायत सदस्य जिजाबराव रामराव यांचे बंधू व माजी जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ. प्रवीण जिजाबराव पाटील यांचे काका असून गेल्या 30 ते 40वर्षांपासून शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ असून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वर विश्वास ठेऊन व शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुख दादासो डॉ. हर्षल माने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेशी एकनिष्ठ राहून त्यांची आज पारोळा कृषी उत्पन्न समिती एरथे उपसभापती पाडी वर्णी लागली असून तालुक्यातून निष्ठावंत शिवसैनिक व शेतकरी वर्ग यांच्यातून न्याय मिळाला.

Protected Content