Home Cities अमळनेर प्राचार्य रवींद्र माळी यांची केंद्रीय समितीवर निवड

प्राचार्य रवींद्र माळी यांची केंद्रीय समितीवर निवड

0
55

प्रा रवींद्र माळी यांना प्रमाणपत्र प्रदान करताना उपसचिव जे. मिनझ.

अमळनेर प्रतिनिधी । येथील कै. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी. फार्मसी चे प्राचार्य प्रा. रवींद्र गंगाराम माळी यांची केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय अंतर्गत पशु कल्याण विभागाच्या प्राण्यांवरील प्रयोगांवर नियंत्रण व देखरेख ठेवणार्‍या समितीवर नॉमिनी म्हणून निवड झाली आहे.

या निवडी अगोदर प्रा. माळी यांनी दिल्ली येथे या विभागाने आयोजित केलेला प्रशिक्षण कोर्स पूर्ण केला व त्यानंतर विभागाची लेखी परीक्षाही उत्तीर्ण केली. त्यांच्या या निवडीबद्दल फार्मसी कॉलेजचे चेअरमन योगेश मुंदडे, खा. शि. मंडळाचे कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल, कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन, सदस्य डॉ. बी. एस. पाटील, प्रदिप अग्रवाल, डॉ. संदेश गुजराथी, हरी भिका वाणी, कल्याण पाटील व चिटणीस प्रा. डॉ. अरुण जैन यांनी अभिनंदन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound