Home क्रीडा वर्ल्ड कप संघात निवड होताच रवींद्र जडेजाचा भाजपाला पाठिंबा

वर्ल्ड कप संघात निवड होताच रवींद्र जडेजाचा भाजपाला पाठिंबा


jadejamodi
 

मुंबई (वृत्तसंस्था) बीसीसीआयने सोमवारी दुपारी 3.15 च्या सुमारास वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा भारतीय संघ जाहीर केला. अगदी  कोणाच्या ध्यानी मनी नसताना अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला 15 सदस्यीस संघात अचानक स्थान मिळाले. विशेष म्हणजे भारतीय संघात समाविष्ट होताच अवघ्या चार तासाच्या आत जडेजाने भाजपला पाठींबा जाहीर केलाय. त्यामुळे जडेजाच्या या निवडीमागे भाजपा कनेक्शन असल्याची चर्चा रंगत आहे.

 

रवींद्र जडेजाला वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच्या अखेरच्या वन डे मालिकेत संघात स्थान देण्यात आले नव्हते. हार्दिक पांड्याने माघार घेतली, म्हणून त्याची वर्णी लागली होती. परंतु मिळालेल्या तीन संधीतही त्याला फार काही छाप पाडता आली नव्हती. त्यामुळेच विश्वचषकात जडेजाची निवड सर्वांना आश्चर्यात टाकणारी ठरत आहे. विशेष म्हणजे जडेजाची पत्नी रिवाबाने नुकताच भाजपा प्रवेश केला असून रिवाबा जामनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणुक लढवत आहे. गेल्या महिन्यात रिवाबाने भाजपाचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे जडेजाची मोठी पंचायत झाली होती. कारण, त्याच्या वडीलांनी आणि बहिणने गेल्या महिन्यातच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound