स्वाभिमानी पक्षातून हकालपट्टीनंतर रविकांत तुपकरांनी दिली पहिली प्रतिक्रिया

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पक्ष विरोधी कारवाया, पक्ष श्रेष्ठी विरोधात आरोप करणाऱ्या रविकांत तुपकरांची पक्ष संघटनेकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी रविकांत तुपकरांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून हकालपट्टी केली आहे. त्यानंतर रविकांत तुपकर माध्यमांसमोर आले आहे आणि आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

संघटनेसाठी 20- 22 वर्षे काम केल्यानंतर त्याचे फळ असे मिळेल अशी अपेक्षा नव्हती असे म्हणत, कोल्हापूरमध्ये सीमित असणारी संघटना राज्यभर वाढवण्यासाठी काम केले असल्याचे रविकांत तुपकर यांनी म्हटले. आता २४ तारखेनंतर आपल्या पुढच्या भूमिका स्पष्ट करणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले. त्यामुळे आता 24 तारखेच्या बैठकीनंतर रविकांत तुपकर हे नवीन संघटना काढतात ती किंवा कुठल्या पक्षात जातात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

Protected Content