रावेर (प्रतिनिधी)। रावेर शहरात पाण्याच्या वादावरुन हाणामारी करून कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या दोघांना रावेर पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील अंबिका व्यायाम शाळेसमोर, पावर हाऊसजवळ पाणी टँकरवर पाणी भरण्याचे चढा ओढीत सुरेश सोनू शिंदे व मुक्तानंद गंगाराम दाणी दोन्ही रा. शिवाजी चौक रावेर यांनी आपसात वाद झाल्याने दोघांमध्ये हाणामारी केली. दरम्यान घटनास्थळी पोलीस आल्यानंतरही दोघांचे भांडण सुरू होते. पोलिसांनी मुबई पोलीस कायदा कलम 160 प्रमाणे कारवाई करून दोघांनाही अटक केली आहे. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदशनावरुन दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. तर दुसरीकडे त्याच परीसरातील मिलिंद भिका महाजन व सुनील सुधाकर शिंदे दोन्ही रा.शिवाजी चौक रावेर यांचे देखील पाणी भरण्याच्या कारणावरून आरडाओरड व शांतता भंग केल्याने दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.