रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर येथील एवन चिकन सेंटर हॉटेलच्या गल्ल्यातून पंधराशे रुपये जबरीने चोरुन नेल्याची घटना रावेर येथे घडली आहे. हॉटेल मालकाने चोरट्यांना विरोध केला असता मालकाला मारहाण करून जखमी केले. या बाबत पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, “रावेर येथील उटखेडा रोडवरील रुस्तम चौकात शेख तन्विर शेख शकील अहेमद यांची एवन चिकन सेंटर हॉटेल आहे. येथे दि २९ रोजी रात्री आठ वाजता हॉटेल मालक हॉटेल मध्ये काम करत असतांना दोघा चोरट्यांनी हॉटेल मधिल असलेला गल्लातून पंधराशे रुपये जबरीने घेतले.
यावेळी हॉटेल मालका शेख तन्विर शेख शकील अहेमद यांनी दोघ चोरट्यांना काय करता असे विचारले असता चोरट्यांनी लोखंडी कढाईमधील गरम तेल हॉटेल मालकाच्या अंगावर फेकल्याने हॉटेल मालक गंभीर जखमी झाले आहे. या बाबत शेख तन्विर यांच्या फिर्यादी वरुन दोघांविरुद्ध जबरी चोरी भादवी कलम ३९४/३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक शितलकुमार नाईक करीत आहेत.