रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील ३८ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत वृत्त असे की रावेर शहरातील शिव कॉलनी येथे दि १५ रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास एक ३८ वर्षीय विवाहीत महीला बाजारातुन घराकडे येत होती. यावेळी आरोपी पिंटू ऊर्फ संदीप जगनाथ म्हसाने (रा शिव कॉलनी) याने पिडीत महीलेला इशारा केला. मात्र पिडीत महीलेने दुर्लक्ष करून घरात निघुन गेली. पुढे आरोपी संदीप म्हसाने महीलेच्या घरात घुसुन शिविगाळ केली व गळा कापुन चिरुन टाकण्याची धमकी दिली. आरोपी संदीप म्हसाने याला घरातुन बाहेर काढत असतांना विवाहीतीच्या अंगावरील ओढणी ओढून विवाहीतीचा विनयभंग केला. याबाबत रावेर पोलिस स्टेशनला पिडीत महिलेच्या फिर्यादी वरुन भादवी कलम ३५४,३५४ ब,४५१,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक करत आहे.