रावेर प्रतिनिधी । कुसुंबा येथील एका विवाहित 28 वर्षीय महिलेचा विनयभंग करून मुलास जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर तालुक्यातील कुसुंबा खुर्द येथील एका 28 वर्षीय महिलेस शरीर सुखाची मागणी करत तसे न केल्यास तुझी बदनामी करून तुझ्या मुलाला जीवे ठार मारेल, अशी धमकी कुसुंबा खुर्द येथील सचिन रमेश पाटील याने दिल्याने त्याच्या विरुध्द रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात सदर आरोपी विरुद्ध गुरन 14/20 भादवि 354 एडी 500. 504. 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे.कॉ. गफुर शेख व जितु पाटील करीत आहे.