रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रावेर नगरपालिका हद्दीत छोरीया मार्केट व अग्रसेन मंगल कार्यालय येथे रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाची चौकशीची मागणी होत आहे.
दोन्ही कामे अंदाजपत्रकात नमूद केलेल्या प्रमाणा नुसार झाली नसुन या दोन्ही रस्त्यामध्ये सिमेंट देखिल कमी प्रमाणात वापरण्यात आल्याने या रस्त्यांची जळगाव येथील कॉलेटी कंट्रोल मार्फत करण्याची मागणी होत आहे.
रावेर शहरातील नगर पालिका हद्दीत छोटीया मार्केट ते स्वामी समर्थ केंद्र दरम्यान तसेच महामार्ग ते अग्रेसन मंगल कार्यालय पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करण्यात आली आहे. नविन रस्ता करण्यापूर्वी येथे खड्डे पडलेले होते. परंतु संबधीत ठेकेदाराने नविन काम सुरु होण्या पुर्वी रोड रोलरने रस्ता प्रेसिंग करायला हवा होता.
परंतु थेट काँक्रिटीकरण करून दोन्ही ठिकाणी अंदाजपत्रकात नमूद केलेल्या प्रमाणा नुसार क्राँक्रीटीकरण झाली नाही. या दोन्ही रस्त्यामध्ये सिमेंट देखिल कमी प्रमाणात वापरण्यात आहे तसेच पूर्ण क्रॅशहॅण्ड न वापरता निकृष्ट वाळूचा वापर या रस्त्या मध्ये करण्यात आला आहे.त्यामुळे हे दोन्ही रस्ते जन्मा आधीच मृत्यूच्या दारा पर्यंत पोहचल्याने संताप व्यक्त होत आहे.याकडे मुख्यधिकारी समिर शेख व बांधकाम इंजिनियर राणे लक्ष घालण्याची मागणी होत आहे.