भुसावळ प्रतिनिधी । नुकतेच रावेर तालुक्यातील 28 लाख रूपयांचा गोदामात अवैधरित्य मोठ्या प्रमाणावर धान्य जप्त करण्यात आले. धान्य मोठ्या प्रमाणावर कसा आला याबाबत जिल्हा प्रशासनाने चौकशी करावी अशी मागणीचे निवेदन रिपाई (अ)तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
रिपाईचे जिल्हाप्रमुख आनंद बाविस्कर यांनी दिलेल्या निवेदनात १४ ऑगस्ट २०१९ रोजी पुरवठा अधिकारी यांनी खाजगी धान्य गोदामांवर छापा टाकून २८ लक्ष रुपये किंमतीचे धान्यजप्त केले परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर हे आले कुठून ? रावेर शहरात खाजगी गोदामात जे धान्य जमा होते ते धान्य रावेर तालुका पुरवठा अधिकारी व धान्य माफिया यांचे मधील असलेले आर्थिक व्यव्हारा मुळे धान्य माफिया इतक्या मोठ्या प्रमाणात धान्य खाजगी गोदामात जमा करत होते. पुरवठा अधिकारी हे भ्रष्ट असल्याचे चित्र आम्ही बघितले म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करावे अशी मागणी करण्यात आले आहे.
जळगांव जिल्हाप्रमुख नंदाताई बाविस्कर, महानगराध्यक्षा प्रतिभा ताई भालेराव, महानगर उपाध्यक्षा पूनम नाथ, गीता धनगर, शोभा भालेराव ,कल्पना अशोक महाजन, मंगला बाविस्कर, योगिता नाथ, माधुरी रामदास गायकवाड, भारती सुभाष कोळी, रुबिनाबी नाजीम ,मालती अरुण कोल्हे ,बिल्किस, निलोफर बी ,कौसरबी ,पारमांन रशिदाबी आदी उपस्थित होते.