Home धर्म-समाज रावेर येथे दक्षता समितीची बैठक संपन्न

रावेर येथे दक्षता समितीची बैठक संपन्न

0
27
baithak sapanna
baithak sapanna

baithak sapanna

रावेर प्रतिनिधी । नगरपालिका स्तरीय दक्षता समितीची बैठक येथील तहसील कार्यालय आमदार हरीभाऊ जावळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी दक्षता समिती सदस्यांना जावळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी न.पा. स्तरीय दक्षता समितीच्या बैठकीला समितीचे उपाध्यक्ष तथा नगराध्यक्षांच्या दारे मोहम्मद सदस्य मुरलीधर महाजन, विठ्ठल पाटील, अमजद खान, कांतीलाल महाजन आदींनी बैठकीला उपस्थिती दिली. तसेच जावळे यांचे हस्ते अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका व गॅस जोडणी वाटपासाठी राज्यव्यापी विशेष मोहीमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अजनाड येथील कै. दिपक रामकृष्ण पाटील हे नागमोडी नदीत बुडून मृत्यु झालेने त्यांचे वारस छाया पाटील यांनी आमदार जावळे यांचे हस्ते ४ लाख रुपये नैसर्गिक अपत्ती म्हणून अनुदान देण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, हरीलाल चौधरी, तहसीलदार उषाराणी देवगुणी, पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound