रावेर (प्रतिनिधी) शहरातील एमजे मार्केट मधील दुकान फोडून माल लंपास करणाऱ्या चोरट्यास रावेर पोलिसांनी अवघ्या चार तासात अटक केली आहे. तसेच त्याच्या कडून चोरीतील मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आलाय.
या बाबत वृत्त असे की, रावेर शहरातील एम जे मार्केट येथून दि 15 च्या रात्री चोरट्याने दुकानाचे सेटर वाकवून सूरज प्रोव्हिजनमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुकानामधील, काजू,बदाम,सिगारेट पाकीट चोरुन नेले. तर जवळ असलेल्या इंडिया क्रियेशन या रेडीमेड दुकानातुन शर्ट,फूलपॅन्ट कपडे चोरुन नेले. या बाबत रावेर पोलिसात अशोक मूलचंदानी यांच्या फिर्यादी वरुन रावेर पोस्टेला भादवी कलम- 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार तासात चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
एमजे मार्केट चोरी प्रकरणी पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी तपासाचे चक्र फिरविण्यास सुरुवात केले.त्यानुसार फौजदार नाजीम शेख,पो ना ओमप्रकाश सोनी,पो कॉ भरत सोपे, सोहेल गणेश यांना मार्गदर्शन करत अवघ्या चार तासाच्या आत सराईत गुन्हेगार महेंद्र उर्फ़ गोंडु कोळी (रा निंबोल) यास ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता सदरची दुकानफोड़ी त्यानेच केली असल्याचे उघड झाले. त्याच्या कडून चोरीस गेलेला 8500 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला असून रावेर पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे नागरीकांमधून पो.नि. रामदास वाकोडे व त्यांच्या स्टाफचे अभिनंदन केले जात आहे.