उत्कृष्ट योग शिक्षक आणि उत्कृष्ट योगसाधक पुरस्काराकरिता प्रस्ताव

International Yoga Day large

जळगाव प्रतिनिधी । निर्धार योग प्रबोधिनीच्या माध्यमातून जागतिक योग दिनानिमित्त उत्कृष्ट योगशिक्षक आणि उत्कृष्ट योगसाधक पुरस्काराकरिता प्रस्ताव मागविण्यात येत आहे. योगदिनाचे औचित्य साधत योगक्षेत्राला समृद्ध करणाऱ्या महानुभवांचा सत्कार करण्यात येणार असून पुरस्कार जळगाव, धुळे आणि नंदुरबार खान्देश विभागातील साधकांसाठी असणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून योग क्षेत्रात सेवा देत आहेत असे योग शिक्षक आणि ज्यांनी योग साधनेच्या बळावर असाध्य आजारातून स्वतःची सुटका करवून घेतली अशा योगसाधकास हा पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे. अशा पुरस्कारामुळे खान्देश मधील योग क्षेत्रास एक नवसंजीवनी मिळणार आहे. समाजापुढे असे योग शिक्षक येतील जे प्रसिद्धी परान्मुख होवून निरंतर निस्वार्थ भावनेने सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. योगाची कास धरत नियमित योग साधना करून आपल्या असाध्य आजारांना कायमचा दूर करणारा योगसाधक खऱ्या पुरस्कारास पात्र आहे. यामुळे अशी अनेक उदाहरणे समाजासमोर येतील की ज्यांनी योगाच्या माध्यमातून अनेक जीवघेण्या आजारांवर मात केलेली आहे.

सदर पुरस्कारासाठी आपला प्रस्ताव पाठविण्यासाठी कृणाल महाजन ९२०९२५०५५५, स्मिता पिले ९४२२३४७८३३ आणि ज्ञानेश्वर पाटील ९८२२६२५६०९ यांना संपर्क करावा किंवा ५३/११, भगीरथ कॉलोनी, शिव कॉलोनी स्टॉप समोर, स्टेट बँकेजवळ या पत्त्यावर पाठवावा असे आवाहन निर्धार योग प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content