Home Cities भुसावळ रावेर तालुक्यात रक्षा खडसे यांनी साधला मतदारांशी संवाद

रावेर तालुक्यात रक्षा खडसे यांनी साधला मतदारांशी संवाद


raksha khadse

भुसावळ प्रतिनिधी । भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती सेना महायुतीच्या उमेदवार श्रीमती रक्षाताई निखिल खडसे यांच्या प्रचार रावेर तालुक्यातील लूमखेडा, उधळी बु, उधळी खु, रणगाव, तासखेडा, गाते या गावात पार पडला. यावेळी रक्षाताई खडसे यांनी गावातील नागरीकांना प्रत्यक्षपणे संवाद साधला यावेळी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी रावेर लोकसभा संयोजक व जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जि.प. माजी अध्यक्ष अशोकभाऊ कांडेलकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.मिलिंद वायकोळे, रावेर पंचायत समिती सभापती माधुरीताई नेमाडे, बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवृत्तीभाऊ पाटील, जिल्हा परिषद सदस्य कैलास सरोदे, संजय गांधी निराधार योजना तालुकाध्यक्ष शिवाजीराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्रीकांत महाजन, तालुका सरचिटणीस महेश चौधरी, पंचायत समिती उपसभापती अनिताताई चौधरी, पंचायत समिती सदस्य कविताताई कोळी, पंचायत समिती सदस्य धनश्रीताई सावळे, पंचायत समिती सदस्य रूपालीताई कोळी, पंचायत समिती सदस्य योगिताताई वानखेडे, भाजपा महिला आघाडी अध्यक्ष नेहाताई गाजरे, रेखा बोंडे, सचिन बऱ्हाटे, गोलू महाजन, सदाशिव चौधरी बंटी, सदाशिव कोळी, ललित पाटील, पांडुरंग झांबरे, विठ्ठल चौधरी, नितीन कोळी, महायुतीचे सन्माननीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound