रावेर प्रतिनिधी । शहरातून जाणाऱ्या बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावर विविध व्यावसायिकांनी केलेले आहे. हे अतिक्रमण काढण्यासंदर्भात ४५ अतिक्रमण धारकांना सार्वजनिक बांधकाम विभागाने लेखी नोटिसा बजावल्या होत्या. त्यापैकी केवळ दोन जणांनी स्वतःहून अतिक्रमण काढले आहे. तर अद्यापही ४३ जणांचे अतिक्रमण कायम असल्याने हे अतिक्रमण काढण्यासाठी बांधकाम विभागातर्फे हालचाली सुरु झाल्या आहेत.
शहराच्या मध्यातून बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्ग जातो. या राज्यमार्गाचे रूपांतर आता राष्ट्रीय महामार्गात झालेले आहे. मात्र या रस्त्यावर नवीन रेस्ट हाऊसपासून ते उटखेडा फाट्यापर्यंत दोन्ही बाजूनी विविध व्यावसायिकांनी अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे रस्त्याची रुंदी या भागात कमी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. याचा परिणाम म्हणून अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
या ४५ जणांना नोटीस
या रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या शिव कोटा मार्बल, साई सद्गुरू हॉटेल, शाम मार्बल, बालाजी मार्बल, पांडेजी कँटीन, श्री श्री गणेश मार्बल, चैतन्य हॉस्पिटल, आस्था टाईल्स, हरी ओम मार्बल, संगम एजन्सी, राजस्थान मार्बल, महाराजा ट्रेडर्स, समर्थ कोल्ड्रिंक्स, धनलक्ष्मी स्टील, समर्थ हॉस्पिटल, श्री एजन्सी, संगम एजन्सी, आकाश वेल्डिंग, वर्क्स, द्वारकाई प्लायवूड, कृतिका आटो पार्टस, भारत टायर्स पुरुषोत्तम निंबाळकर , श्रीराम अग्रवाल यांच्यसह एकूण ४५ जणांना सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रम केल्याबाबत २६ मार्चला नोटीस बजावली होती. त्यापैकी श्रीराम अग्रवाल व पुरुषोत्तम निंबाळकर यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले आहे. तर उर्वरित ४३ जणांनी अद्याप अतिक्रमण काढलेले नाही.
बांधकाम विभागाने अतिक्रमण धारकांना तीन दिवसात अतिक्रमण काढण्याची सूचना दिली होती. मात्र अनेकांनी अतिक्रमण अद्यापी काढले नाही.न काढल्यास पोलिस बंदोबस मागवीण्यात येईल. सार्वजनिक बांधकाम विगाभाची अतिक्रमण संदर्भात नोटिस मिळाली असून मी स्वता:हुन हे अतिक्रमण काढून घेणार आहे.माझ्या हॉस्पिटल समोर १५ ते २० घरे ही सार्वजनिक बांधकामच्या जागेत अतिक्रमीत आहे. ही पण अतिक्रम काढण्याची मागणी समर्थ हॉस्पिटलचे डॉ भगवान कुवटे यांनी बोलतांना सांगितले.