रावेरात दारु अड्ड्यावर धाड ; एकाला अटक

 

रावेर प्रतिनिधी । शहरातील जयभोले ढाबा समोर गावठी दारू विकत असलेल्या व्यक्‍तीस रावेर पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जयभोले ढाबा समोर आरोपी अरविंद गोविंदा पाटील रा.केरहाळे हा दारू विकत असल्याची गुप्त माहिती पो.नि रामदास वाकोडे, एपीआय शितलकुमार नाईक, एएसआय गफूर तडवी, पो.कॉ.भागवत धांडे, पो.कॉ.तुषार मोरे, पो.कॉ.निलेश चौधरी आणि पो.कॉ.उमेश नरवाडे यांनी मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून आज आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याजवळून 260/- रु डिप्लोमा व्हिस्की (180 ml च्या 2 बाटल्या), 600 रुपये किंमतीची मॅक्डोल व्हिस्की (180 ml च्या 4 बाटल्या), 624 रु. देशी बॉबी (180 mlच्या 12 बाटल्या), 624 रुपयेच्या देशी टॅगो (180 ml च्या 12 बाटल्या) असा एकूण 2 हजार 108 रुपयांचा माल मिळाला असून आरोपीवर गुरन-73/2019 कलम-65(ई)मु दारूबंदी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास हे.कॉ.सतीश सानप करीत आहेत.

Protected Content