रावेर पोलिसांनी अवैध गुरांची वाहतूक करणारा ट्रक केला जप्त

रावेर प्रतिनिधी । रावेर पोलिसांनी मध्य प्रदेशातून लालमाती मार्गे महाराष्ट्रात गुरांची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रक पकडला आहे. त्यात 50 हून अधिक गुरे असल्याचे प्राथमिक माहितीवरून दिसून येते आणि तीन दिवसात गुरांच्या तस्करीवर पोलिसांची ही दुसरी कारवाई आहे.

पोलिस सुत्रां कडून समजलेली माहिती अशी की दुपारी साडे तीन वाजेच्या नजिक मध्य प्रदेश  शेरी नाका मार्गे महाराष्ट्रात रावेरकडे अवैध गुरांनी कोंबुन भरलेला ट्रक येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली माहीती आधारे पोलिस निरिक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी लालमाती नजिक जेके01एएल1559 नंबरचा ट्रक पकडला. ट्रकची झडती घेतली असता त्यात अवैध पध्दतीने कोंबुन सुमारे ५० च्यावर गुरे भरली होती. ही सर्व गुरे जळगाव बाफना गौ शाळेत पाठवण्यात आले असून पाल आऊट पोष्टला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. मंडसोळ (मध्य प्रदेश) दोन आरोपी ताब्यात देखिल घेतले आहे.

गुरे तस्करांवर उपनिरीक्षकाची धडक कारवाई

दोन दिवसांपूर्वी चोरवड येथे कोंबुन वाहतूक करणारे २८ गुरांना जिवनदान देऊन पोलिस उपनिरिक्षक सचिन नवले प्रकाशझोतात आले होते. त्यांनी आज पुन्हा धडक कारवाई केली असून सुमारे ५० गुरांचा ट्रक आदिवासी पट्यातील लालमाती नजिक पकडल्याने पशुप्रेमींमध्ये श्री नवलें’चे कौतुक होत आहे. यावेळी त्यांच्या सोबत पोलिस कर्मचार्य संदीप धनगर राजेंद्र राठोड इस्माल तडवी सुकेश तडवी देखिल होते. मध्य प्रदेशातुन मोठ्या प्रमाणात पाल मार्गे गुरांची अवैध तस्करी केली जाते याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी देखिल पशुधनप्रेमींची आहे.

 

Protected Content