पालमध्ये रावेर पोलीसांचे छापे; अवैध दारू जप्त

रावेर प्रतिनिधी । रावेर पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध दारू अड्यावर धाड टाकून तिघांना अटक केली आहे.व त्यांच्या कडून गावठी दारू व साहित्य जप्त केले आहे.

 

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील पाल येथे आज रावेर पोलिसांनी छापे टाकून अवैध दारूचे साहित्य जप्त केले आहे.व आरोपी प्रदीप राठोर,राजू जाधव, पूनमसिंग बारेला तिघेही पाल येथील रहिवासी असून हे तिघे जण पाल गावात वेग-वेगळ्या ठिकाणी गावठी हात भट्टीची दारू अवैधरित्या बाळगुन विक्री करत होते.

पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शना खाली पाल गावात छापे टाकून ४ हजार रुपये किंमतीची ६० लिटर दारू नष्ट केली आहे. ही पोलिस कर्मचारी राजेंद्र राठोर नरेंद्र बाविस्कर अतुल तडवी यांनी केली आहे.

Protected Content