रावेर प्रतिनिधी | अविवाहीत तरूणीला विवाहाचे आमीष दाखवून तिचे शोषण करणारा तालुक्यातील खानापूर येथील बँकेच्या तत्कालीन मॅनेजरला अटक करण्यात आली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या संदर्भात माहिती अशी की, सेंट्रल बँकेच्या खानापूर शाखेचा तत्कालीन व्यवस्थापक नितीन शेंडे याने तरूणीला विवाहाचे आमीष दाखवून तिच्यावर लैंगीक अत्याचार केले होते. त्याला पोलिसांनी अखेर अटक केली असून न्यायालयाने ३१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तालुक्यातील एका २३ वर्षीय अविवाहित युवतीला लग्नाचे आमिष दाखवून बँक मॅनेजर शेंडे याने वेगवेगळ्या ठिकाणी पीडित युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे पीडित तरुणीने येथील पोलिसांत १५ ऑगष्टला फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यावर शेंडे याने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. मात्र शेंडे याला उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला होता. यानंतर आता साडेपाच महिन्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.