रावेर प्रतिनिधी । बिहार येथील यूथ जूनियर राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धा दि.13 ते 23 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत रावेर येथील खेळाडूंनी अतिशय दमदार कामगिरी करत 2 सिल्व्हर पदक पटकावले आहे.
55 किलो वजन गटात अभिषेक महाजन तर 73 किलो वजन गटात किरण मराठे याने सिल्व्हर पदक पटकाविले, किरण मराठे याचे अवघ्या 1 किलोने सुवर्ण पदक हुकले आहे. अभिषेक महाजन याने राष्ट्रीय स्पर्धेत सलग 5 पदके पटकावून सुवर्ण कामगिरी केली. उदय महाजन यास 5 व्या क्रमांक वर समाधान मानावे लागले. या सर्व खेळाडूंनी सदर स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.
तसेच बेहरामपुर ओरिसा येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेतही रावेरचे खेळाडू सुवर्ण कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे. तर गेल्या 5 वर्षात रावेरच्या खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करून रावेरची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय पातळीवर रावेरचे खेळाडू पदक पटकवतील अशी खात्री प्रशिक्षक अजय महाजन यांनी व्यक्त केली.
वरील सर्व खेळाडू हे रावेर येथील व्ही.एस.नाईक महाविद्यालय जिमखानात सराव करतात त्यांच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा वेट लिफ्टिंग संघटनेचे प्रकाश मुजुमदार, प्रदीप मिसर, संजय मिसर, राजेश शिंदे, प्रकाश बेलस्कर, आमोद महाजन, यशवंत महाजन, व्ही.एस.नाईक महाविद्यालयाचे चेअरमन हेमंत नाईक, प्राचार्य डॉ.पी.व्ही दलाल, क्रीडा शिक्षक उमेश पाटील, आधुनिक व्यायाम शाळाचे अध्यक्ष संदीप महाजन, लखन महाजन, भूषण महाजन, अविनाश पाटील, नितीन महाजन यांच्यासह रावेर शहरातील क्रीडाप्रेमींनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढे वाटचालींसाठी शुभेच्छा दिला आहे.