फटाके फोडण्याच्या वादातून महिलेचा विनयभंग

रावेर प्रतिनिधी । येथे फटाके फोडतांना झालेल्या वादातून महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील बौध्दवाडा या भागात काल रात्री एका महिलेचा पती फटाके फोडत होता. याप्रसंगी फिर्यादीचा पती हा फटाके फोडत होता. त्यास अजय विजय मेढे उर्फ भद्रकाली बोलला की माझ्या जवळ तू फटाके का फोडीत आहे ? या कारणावरून आरोपी व फिर्यादीचा पती यांच्यात भांडण सुरू असताना फिर्यादीची सासू ही त्यांचे भांडण सोडविण्यास गेली असता तिचा हात पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्याचा तिने विरोध केला असता तिला चापटांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपीने त्यांच्या घरात घुसून पतीस चपटा बुक्क्यांनी मारहाण करीत असताना फिर्यादी महिला ही त्यांचे भांडण सोडविण्यास गेली असता आरोपीने फिर्यादी च्या घरातील विळ्याने फिर्यादिस जीवे ठार मारण्याचे उद्देशाने फिर्यादीच्या मानेवर तसेच उजव्या हातावर विळ्याने गंभीर दुखापत केली.

या संदर्भात संबंधीत महिलेने रावेर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसारगु.र.नं. २०७/२०२० भा.द.वी.कलम ३०७, ३५४, ४५२, ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे अजय विजय मेढे उर्फ भद्रकाली (रा. बौद्ध वाडा रावेर) याच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या संदर्भातील संशयित फरार झाला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शीतलकुमार नाईक व त्यांचे सहकारी करत आहेत.

Protected Content