सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील खिर्डी येथील रहिवासी तथा नुकताच संगीतात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये स्थान मिळवलेल्या उत्कर्ष नेमाडे या युवा संगीतकाराचे खासदार रक्षाताई खडसे यांनी निवासस्थानी जाऊन त्याचे कौतुक केले.
खिर्डी बुद्रूक (ता.रावेर) येथील उत्कर्ष किरण नेमाडे याला गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक तरूण संगीतकार म्हणून स्थान मिळाले आहे. एका लहानशा गावातील उत्कर्षने घेतलेली ही भरारी अतिशय अभिमानास्पद अशीच आहे. विश्वविक्रम प्रस्थापित केल्यानंतर त्याचे विविध मान्यवर कौतुक करत आहेत.
या अनुषंगाने खासदार रक्षाताई खडसे यांनी उत्कर्षच्या घरी भेट देऊन त्याचे कौतुक केले. त्यांनी उत्कर्षशी संवाद साधून त्याच्या संगीत साधनेबाबत जाणून घेतले, व त्याला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी उत्कर्षच्या पालकांशीही वार्तालाप केला. यावेळी हरलाल कोळी, महेश चौधरी, पवन चौधरी, किरण नेमाडे, जयेश निमगडे, धीरज पाटील आदी उपस्थित होते.