Raver/Savda रावेर/सावदा प्रतिनिधी । नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आरक्षणामुळे कित्येकांना बहुमत असताना देखील सरपंच पदावर पाणी सोडावे लागले आहे. परंतु अशा काही ग्रामपंचायती रावेर तालुक्यात होत्या ज्या ठिकाणी सरपंच पदावरून पेच निर्माण झाला होता तो तीच अखेर सुटला आहे.
ज्या गावात सरपंच पदासाठी महिलांचे आरक्षण निघाले त्या गावात कुठले प्रभागातून संबंधित संवर्गातील महिलाच निवडून आलेली नसताना त्या ठिकाणी महिलांचे आरक्षण निघाले होते तर काही गावांमध्ये अनुसूचित जमाती उमेदवार निवडून न येता देखील त्या संवर्गाचे आरक्षण निघाले होते त्यामुळे संपूर्ण रावेर तालुक्याचे आता या ग्रामपंचायतीच्या आरक्षणाचे काय होणार याकडे लक्ष लागलं होते.
शेवटी अधिनियम 1964 कलम 5 नुसार यात केला गेला आहे. पाच गावांमध्ये आता पुरुषांना संधी अधिनियम १ ९ ६४ कलम पाच नुसार , ज्या वेळी सरपंचपद अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती किंवा नागरिकांचा मागासवर्गाचा प्रवर्ग ( विमुक्त जाती व भटक्या जमाती यांसह ) महिलांसाठी आरक्षित असेल व उक्त जाती , जमाती किंवा यथास्थिती नागरिकांचा मागासवर्ग यामधील महिला व सदस्य कोणत्याही कारणाने उपलब्ध नसेल , तर सरपंचपद तेवढ्या मुदतीपुरते ( १ ) जर मूलतः अनुसूचित जातीच्या महिलांसाठी असेल , तर अनुसूचित जातीसाठी ( २ ) जर मूलतः अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी असेल तर अनुसूचित जमातीसाठी ( ३ ) जर मूलतः नागरिकांच्या मागासवर्गाच्या महिलांकरिता असे नागरिकांच्या मागासवर्गासाठी आरक्षित असल्याचे समजण्यात येईल .
या गावात होणार महिलांच्या जागेवर पुरुष सरपंच
निंभोरा बुद्रुक अजनाड मोरगाव खुर्द (अनुसूचित जमाती स्त्री) नवीन आरक्षण (अनुसूचित जमाती) कोचुर बुद्रुक,रमजीपुर (अनुसूचित जाती स्त्री) नवीन आरक्षण (अनुसूचित जात)
या गावांमधील निघणार नव्याने आरक्षण
कलम 30 अन्वये जिल्हा अधिकारी यांना असलेल्या विशेष अधिकाराचा वापर करून विवरे खुर्द भोर सुतगाव मस्कावद सिम रेंभोटा या गावांमध्ये संबंधित संवर्गातील जागा उपलब्ध नसल्याने ज्या प्रवर्गासाठी सरपंच पद राखीव ठेवण्यात येते अश्या एका प्रवर्गासाठी ९/२/२०२१ रोजी सकाळी 11 वाजता उपविभागीय कार्यालय फैजपुर येथे सरपंच पदासाठी आरक्षण नव्याने काढण्यात येणार आहे