रावेर प्रतिनिधी । रावेर शहरातील राजे शिवाजी चौकात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एक घर जळुन खाक झाल्याची घटना घडली आहे.
रावेर शहरारातील छत्रपती शिवाजी चौकात रहवासी असलेले सुभाष पाटील कामा निमित्त घराला कुलुप लावुन बाहेर गावाला गेले होते. काल सायंकाळच्या सुमारास घरात अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. यामध्ये फ्रिज पंखा व इतर वस्तु जळून खाक झाली आहे. याबाबतची माहिती मिळताच जवळ असलेल्या मुलांनी आग विझवु लागली तसेच अग्निशामन घटनास्थळी येऊन आग पूर्ण विझवली आहे.