रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जनतेने आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचे प्रतिपादन आ. चंद्रकांत पाटील यांनी येथील बैठकीत केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुक्ताईनगरात २० सप्टेंबर रोजी येत आहे. याबाबत नियोजनासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी रावेर येथे आज बाजार समितीत बैठक घेतली. यात ते म्हणाले की, मुक्ताई नगर रावेर व बोदवड तालुका सुजलम-सुखलम करण्यासाठी तसेच भर-भरून विकास कामे शेतकर्यांच्या शेती संदर्भात समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुक्ताई नगरीत येणार आहेत.
आमदार पाटील मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की शेतकर्यांच्या केळी संदर्भात युवकांना रोजगार देण्यासाठी आताचे सरकार कटीबध्द आहे.आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे सर्वसाधारण जनतेतीलच एक व्यक्ती आहे. आमच्या डोक्यात आमदार की नाही ? यापेक्षा जनतेची कामे व्हावी हाच विचार आहे. विधानसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावर टाकलेला विस्वासाला तळा जाऊ देणार नसल्याची ग्वाही यावेळी आ पाटील यांनी उपस्थित कार्यकर्तेना दिला.
या बैठकीला छोटु पाटील,चेतन पाटील, अमोल पाटील,राहुल पाटील आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.