Home Cities रावेर महसूल पथकाची अवैध वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई

महसूल पथकाची अवैध वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई

0
32

रावेर प्रतिनिधी । येथील महसूल पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करून धडक कारवाई केली आहे.

महसूल सुत्रां कडून मिळालेली माहीती अशी की सूटीच्या दिवशी रवीवारी पहाटे रावेर महसूल विभागाच्या पथकाने वाळू वाहतुकीच्या संशयातुन तिन ट्रक्टर व ट्रॉलींवर धडाकेबाज कारवाई केली आहे. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.तिघाही ट्रक्टर-ट्रॉलीचा पंचनामा करण्यात आला आहे. ही कारवाई मंडळ अधिकारी विठोबा पाटील, दादाराव कांबळे, गुणवंत बारेला, रविंद्र शिंगणे, यासीन तडवी श्रीसाड अप्पा वानखेडे गणेश चौधरी यांच्या पथकाने केली आहे.


Protected Content

Play sound