मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माध्यमातून केलेल्या कामाची दखल म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे, उपसभापती निलमताई गोरे, आ. मनिषा कायदे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर लोकसभा संपर्क प्रमुखपदी संजनाताई चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
संजना पाटील या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात काम करीत असून आ.चंद्रकांत पाटील यांना खंबीर साथ देवून वडिलांना सहाय्य म्हणून त्या पोट तिडकिने ग्राउंड लेव्हल महिला भगिनी व युवतींना सोबत घेवून काम करीत आहे. मतदारसंघात देखील त्याचा मोठा जनसंपर्क असुन मतदार संघाचा त्यांना बारीकसारीक माहिती असल्यामुळे पक्षाला त्यांच्या अनुभवाचा फायदा होणार असल्याचा दावा पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेत हि जवाबदारी सोपवली आहे.
यावेळी संजनाताई यांनी सांगितले की, “पक्षाने दिलेली जबाबदारी व केलेल्या छोट्याशा कामाचा हा खूप मोठा सन्मान असून याची पावती आपण कामातून देणार असुन पक्ष संघटन व पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असुन शासनाने केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी वचनबद्ध आहे. आदिशक्ती श्री. संत मुक्ताई साहेबांच्या आशीर्वादाने मोठी जबाबदारी आलेली असून महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत विविध योजना तळागाळातील माता भगिनी पर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान या निवडीबद्दल आ.चंद्रकांत पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान महाजन, युवा सेना जिल्हा प्रमुख पंकज राणे, मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, तालुका प्रमुख छोटू भोई आदींनी अभिनंदन केले आहे.