बिबट्याने गाय केली फस्त; पाडळे खुर्द परिसरात भितीचे वातावरण

रावेर प्रतिनिधी | तालुक्यातील पाडळी खुर्द येथील शिवारात बिबट्याने गाईला फस्त केल्याची घटना घडल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

पाडळे खुर्द येथे शेती शिवार चराईसाठी गेलेल्या गाईला बिबट्याने फस्त केल्याची घटना काल सायंकाळी घडली आहे. येथील रहिवासी हबीब तडवी यांची पाळीव गाय जंगलात चराईसाठी गेली होती.यावेळी सायंकाळी बिबट्याने अचानक हल्ला करून गाय फस्त केली असून येथील पंचायत समिती सदस्य जुम्मा तडवी यांनी घटनास्थळी भेट दिली व पगमार्ग बघितले असता हल्ला करणारा प्राणी बिबट्या असल्याचे सांगण्यात आले आहे.यापूर्वी या भागात एक कुत्रा व शेळीवर देखिल असाच् हल्ला करून फस्त केली होती.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आज सकाळी वनपाल अतुल तायडे पाडळे खुर्द येथे रवाना झाले आहे.

दरम्यान, आधीच रावेरात हिंस्त्र प्राण्याचा धुमाकुळ वनविभागा कडून थांबता-थांबत नसतांना आता पाडळे खुर्द येथे बिबट्याचा धुमाकुळ सुरु झाला आहे.त्यामुळे वन विभागा कडून बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. तर परिसरात यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे.

Protected Content