Home राजकीय बुधवारी रावेर भाजपा तालुकाध्यक्ष पदाची निवडणूक

बुधवारी रावेर भाजपा तालुकाध्यक्ष पदाची निवडणूक

0
24

bjp

रावेर, प्रतिनिधी | रावेर भाजपा तालुकाध्यक्ष पदाची निवडणूक बुधवार २५ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता कृषी उपन्न बाजार समितीच्या हॉल मध्ये होणार आहे. यासाठी भाजपाकडून जिल्हा निवडणूक अधिकारी विजय धांडे व दिनेश नेमाडे उपस्थित राहणार आहे.

विद्यमान तालुकाध्यक्ष सुनिल पाटील यांचा कार्यकाळ दि २५ रोजी संपणार असून नविन तालुकाध्यक्ष पदाची निवडणूक लवकरच संपणार आहे इच्छुक म्हणून श्रीकांत महाजन, तांदलवाडी, वासुदेव नरवाडे विवरे, महेश चौधरी दसनुर, दिलीप पाटील रावेर, उमेश महाजन रावेर, दुर्गादास पाटील निंभोरा, राजेंद्र लासुरकर खिरवळ, मिलिंद वायकुळे, रोझोदा संजय माळी, राहुल पाटील वाघोदा, अॅड प्रवीण पाचपोहे मुंजलवाडी आदी इच्छुक आहे. यासाठी भाजपाचे सर्व शाखाध्यक्ष,सक्रीय सदस्य, बूथ समिती कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे अवाहन भाजपा कडून करण्यात आले आहे.

सुनिल पाटीलांचा राहिला यशस्वी कार्यकाळ

विद्यमान तालुकाध्यक्ष सुनिल पाटील यांचा कार्यकाळात रावेर पंचायत समिती आठ तसेच भाजपाची सत्ता आली तसेच जिल्हा परिषदचे चार सदस्य निवडून गेले आहे तर लोकसभा निवडणुकीत भाजपाला रावेर तालुक्यातुन त्यांच्या कार्यकाळात चांगली लिड मिळाले आहे. आता पुन्हा मी इच्छुक नसल्याचे सुनिल पाटील यांनी पत्रकाराना सांगितले.


Protected Content

Play sound