Home राजकीय रावेर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन साजरा

रावेर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन साजरा


maxresdefault 1509196878228

रावेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त तालुक्यातील कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन करून आपण सगळे नव्या जोमाने व आत्मविश्वासाने कामाला लागून पक्षाला गतवैभव प्राप्त करून देऊ, असा निर्धार मनसेचे तालुका अध्यक्ष संदीपसिंह राजपूत, अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज येथे व्यक्त केला.

येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज (शनिवार) तालुका कार्यालयात पक्षाचा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करून व सदस्य नोंदणी करण्यात आली. यावेळी विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महिला शहर अध्यक्ष सौ. पुनम चौधरी, तालुका उपाध्यक्ष अरूण चौधरी भगीरथ पवार गटप्रमुख विकास राऊत योगेश चौधरी तुळशीराम पवार विद्यार्थी सेना अध्यक्ष धनराज बाविस्कर, वैभव पिंपळे, महेंद्र युवतकर, शाखाध्यक्ष मोहन महाजन, सुनील हंसकर, महेंद्र तायडे, शुभम मराठे, कपिल गायकवाड, निलेश पाटील, गोपाल पाटील, राजू बोरसे, संजय सपकाळे, कुंदन राऊत, सोनु महाजन, समिर शेख, महेंद्र मोहरकर व गजानन पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. तालुकाध्यक्ष राजपूत यांनी प्रास्ताविक केले तर आभार अरूण चौधरी यांनी मानले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound