रावेर प्रतिनिधी । रावेर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांना नामनिर्देशनपत्र दाखल केले. यावेळी मतदारसंघातील माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच व सदस्यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
शहरातील छोरीया मार्केट येथे सकाळी परीसरातील मान्यवर व मोठा जनसमुदाय विजय संकल्प मेळाव्यासाठी उपस्थित होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या पुतळयास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आल्यावर मिरवणूक मार्गस्थ झाली. यावेळी फैजपूर येथील शेख कुरबान, रावेर येथील पंकज वाघ, गणेश बोरसे, विकास पाटील, माजी नगराध्यक्ष शितल पाटील, नगरसेवक शेख सादीक, डॉ. सत्तार, अॅड. सूरज चौधरी, सुधीर पाटील, दिलीप शिंदे, अब्दुल मुतल्लीब, सिताराम पाटील, पंकज वाघ, फैजपूर येथील शेख कुरबान, नासीर शेख, अन्वर खाटीक, लखन मंदवाडे, शेख हमीद शेख इकबाल, यावल नगरसेवक अभिमन्यु चौधरी, राजु वाणी, तुकाराम बारी अमोल देशमुख मनोज करणकाळ, करिम मन्यार, राजु शेख, शेरखान, अन्सार शेठ, भुसावळ माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, अख्तर पिंजारी, दुर्गेश ठाकूर, सतिश घुले, कृ.उ.बा. सभापती सचिन चौधरी, धिरज चौधरी, ललिताताई अनिल चौधरी, हर्षाताई चेतन चौधरी, नितीन धांडे, रमेश येवले आदी उपस्थित होते.