रावेर प्रतिनिधी | येथील आरोग्य सभापती ॲड. सूरज चौधरी यांची तेली महासंघाच्या जळगाव जिल्हा युवक जिल्हाध्यक्षपदी (ग्रामीण पूर्व विभाग) निवड करण्यात आली आहे.
येथील नगरपालिकेचे आरोग्य सभापती तथा नगरसेवक ॲड. सूरज चौधरी यांची तेली महासंघाच्या जळगाव जिल्हा युवक जिल्हाध्यक्षपदी (ग्रामीण पूर्व विभाग) निवड करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष श्यामकांत ईशी यांनी त्यांच्यावर युवक जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. या निवडीचे पत्र प्रदेश कार्याध्यक्ष श्यामकांत ईशी, जिल्हाध्यक्ष सुनील चौधरी, यांनी सूरज चौधरी यांना प्रदान केले आहे.
विशेष बाब म्हणजे ॲड. सूरज चौधरी यांच्या वाढदिवशीच त्यांची या पदावर निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल ऍड.चौधरी यांचे प्रदेश स्तरावरील नेते, पदाधिकार्यांसह समाजबांधवांनी अभिनंदन केले आहे.