एरंडोल प्रतिनिधी । कोरोना महामारीमुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. यामुळे गोरगरीबांची उपासमार होऊ नये म्हणून श्रध्देय राजीवकृष्णजी महाराज (मथुरावासी,श्रीराम-जानकी सेवा समिती,धुळे) सामाजिक कार्यकर्ते आनंदभाऊ दाभाडे व माजी उपनगराध्यक्षा छायाताई दाभाडे यांच्यातर्फे मुगपाट येथील आदीवासी भिल्ल कुटुंबियांना शिखा वाटप करण्यात आले.
एकूण ७० कुटुंबांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. श्रध्देय राजीवकृष्णजी महाराज,मथुरावासी या महाराजांनी केलेल्या संकल्पाची या माध्यमातून पूर्तता करण्यात आली.