Home धर्म-समाज कॉग्रेसच्या मदतीने दिव्यांग महिलेच्या मिळाले हक्काचे रेशनकार्ड

कॉग्रेसच्या मदतीने दिव्यांग महिलेच्या मिळाले हक्काचे रेशनकार्ड

0
34

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील काही महिन्यांपासून तहसिल कार्यालयाच्या हेलपाट्या मारत असलेल्या तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथील स्मिता कासार या दिव्यांग महिलेस कॉग्रेस तालुकध्यक्ष सचिन सोमवंशी पुढाकाराने आपल्या हक्काचे रेशन कार्ड मिळाले.

तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथील स्मिता कासार या दिव्यांग महिला काही महिन्यांपासून आपल्या रेशनकार्डसाठी तहसिल कार्यालयाच्या हेलपाट्या मारत होत्या. तहसिल कार्यालयात आल्यावर त्यांनी कॉग्रेसचे तालुकध्यक्ष सचिन सोमवंशी यांची भेट घेत आपबिती कथन केली.

याबाबत सचिन सोमवंशी यांनी पुढाकार घेत तात्काळ पाचोरा तहसिलदार कैलास चावडे यांना याविषयी सविस्तर माहिती देवून महिला दिनी दिव्यांग स्मिता कासार यांना हक्काचे रेशन कार्ड मिळावे म्हणून विनंती केली. तहसिलदार कैलास चावडे यांनी या प्रकरणाची दखल घेत अवघ्या काही तासातच स्मिता कासार यांना रेशन कार्ड सुपुर्द केले.


Protected Content

Play sound